प्राप्त हवामान बदलानुसार,दि. १७ जुलै २०२३ रोजी झारखंड आणि लगतच्या छत्तीसगड राज्यात, कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून,वातावरणातून चक्राकार वारे वाहत आहेत.हे चक्राकार वारे पश्चिम-वायव्य दिशेने छत्तीसगड वरून पुढे सरकण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
त्यानंतर दि.१८ जुलै २०२३ रोजी पुन्हा एक नविन चक्राकार वादळ बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पूर्व आणि पाश्चिम विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाच्या हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यामुळे नदी नाल्यांवर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने, नदीकाठच्या गावातील लोकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचा प्रयत्न करावा.हा इशारा आज दि. १७ जुलै ते २३ जुलै पर्यंत देण्यात येत असून गोंदिया,भंडारा, गडचिरोली, यवतमाळ जिल्हयात अति मुसळधार आणि अकोला अमरावती,वाशिम जिल्ह्यातही काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याचे वृत्त, रुईगोस्ता ता. मानोरा जि.वाशिम येथील हवामान तज्ञ गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दूरध्वनीवरून,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.त्यामुळे ग्रामिण भागातील शेतकरी,शेतमजूर, गुराखी,मेंढपाळ यांनी सावधगीरी बाळगावी.ढगांचा गडगडाट आणि विजेचा लखलखाट सुरू असतांना,झाडाखाली थांबू नये. आपली दुचाकी,चारचाकी वाहने, बैलगाड्या नदी नाल्याच्या प्रवाहातून काढण्याचा प्रयत्न करू नये.असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.