कारंजा (लाड) : येथून जवळच असलेल्या, दारव्हा तालुक्यातील ग्राम रामगाव (रामेश्वर) येथील पवित्रपावन उत्तरमुखी अडाण नदीच्या त्रिवेणी संगमावरील औषधी वनामधील सिद्ध गुरु श्री. रामनाथ महाराज मठ संस्थान येथील बैलपोळा मठाचे मठधिपती बाबाजी,गुरुमाऊली सिद्ध श्री.अभेद्यनाथ गुरु सिद्ध सेवानाथ महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत व आदेशाने उत्साहात संपन्न करण्यात आला. या प्रसंगी गुरुमाउलीच्या आदेशाने बैलपोळ्याच्या पूजनाचा सन्मान मठाचे परमभक्त,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा कारंजा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय मधुकरराव कडोळे यांना देण्यात आला. संजय कडोळे यांचे हस्ते बळीराजाचे दैवत बैलांचे पूजन करण्यात येवून बैलांना पुरणपोळीचे सुग्रास भोजन देण्यात आले. त्यानंतर संस्थानच्या गोरक्षणचे मजूर, गुराखी,गायकी यांना मठातर्फे वस्त्रदान करण्यात आले. याप्रसंगी मठाचे शिष्य परिवारातील नागनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ, मार्तंडनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ,भक्तमंडळी रविन्द्र कस्तुरे गुरुजी, संतोष तुकाराम घाटे, बाळकृष्ण महादेव सदाफळे, अंगुली महादेव मडकराम, किसनराव काळे, राजु ठक, रक्षित धरमसी,स्वप्निल तायडे, रमेश राठोड, करंजमहात्म्य परिवाराचे प्रदिप विनायकराव वानखडे,कैलास सुरेश हांडे उपस्थित होते.सर्व भक्तमंडळींनी पुरणपोळीच्या सुग्रास भोजनाचा लाभ घेतला. पोळ्याच्या कार्यक्रमाची चोख व्यवस्था मठाचे शिष्य मार्तंडनाथ गुरु सिद्ध अभेद्यनाथ यांनी पार पाडली.