वरोरा : एका वाहनातून देशी बनावट कट्टा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांना मिळाली असता पोलिसांनी वरोरा येथील रत्नमाला चौकात नाकाबंदी करून त्या वाहनातून एक देशी बनावट पिस्तूल दोन जिवंत काडतुसे सह दोघांना अटक केली,सदर घटना दि.२८/१२/२०२२रोजी रात्री ११ते१२च्या दरम्यान घडली.
उपविभागीय पोलीस कार्यालयाला गोपनीय माहिती मिळाली की वरील दोन आरोपी देशी बनावट पिस्टल घेऊन बलेनो गाडी वाहन क्रमांक MH BR ८५९३ या चारचाकी वाहनाने वरोऱ्याकडे येत आहेत, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी कुठलाही विलंब न करता स्थानिक रत्नमाला चौकात पोलीस नाकेबंदी करून सदर वाहनाला थांबवले व त्या वाहनातून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली, दोन आरोपींना अटक करून दोन्ही आरोपी कडून ५ लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात सपोनि राजकीरण मडावी, पोलीस स्टेशनचे जुमडे, गुरनुले, अनिल बैठा, शिंदे, प्रविण निकोडे यांनी केली.