"विकास" कशाला म्हणतात ते कारंजाच्या माजी आमदार तथा माजी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष स्व. प्रकाशदादा डहाके यांना चांगलेच ठाऊक होते. "रोख ठोक पणे वागणारे ते एकमेव नेते" होते. त्यांच्याकडे कुणी किरकोळ कामे घेऊन गेल्यास ते नेहमी सांगायचे कि. रस्ते, नाल्या, विद्युतदिवे ही किरकोळ कामे तर दरवर्षीच करावी लागतात व त्याकरिता स्वायत्त संस्था राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा निधी नेहमी उपलब्ध असतो, परंतु कारंजेकरांच्या कायमस्वरुपी विकास योजनेसाठी त्यांची धडपड असायची. त्यातूनच त्यांनी उपजिल्हा रुग्णालय असो कारंजाच्या वेशींचे काम असो वन पर्यटन क्षेत्र असो किंवा ऋषी तलावाचे गाळ काढण्याचे काम असो असे कायमस्वरूपी विकासाची कामे त्यांनी केली आहे तसेच भंडारा जिल्हयातील गोसीखुर्द धरणाच्या वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचे पाणी वाशीम जिल्ह्यातील कारंजा-मानोरा-मंगरुळपिर येथील लाखो हेक्टर शेतजमीनीला मिळावे म्हणून प्रस्ताव तयार करून तत्कालिन जलसंपदा मंत्री ना जयंतजी पाटील यांचेकडून मंजूर करून घेतला होता.प्रामुख्याने ग्रामिण नागरीक आणि शेतकर्यांच्या विकासा करीता ते आग्रही असायचे. पद असो वा नसो सरकारमध्ये त्यांचा वचक असायचा. आपल्या सत्य आणि परखड विचारसरणीने त्यांनी कारंजा तालुक्यामध्येच नव्हे तर वाशीम जिल्ह्यामध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले होते. त्यामुळेच विरोधकांनाही त्यांचे महत्व वाटायचे. आज स्व. प्रकाशदादा डहाके हे आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांचे विकासाचे विचार आजन्म आपल्या सोबतच रहातील. लवकरच येत्या सहा महिन्याचे आत स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघाच्या निवडणूका संपन्न होत आहेत. त्या निमित्ताने त्यांचे विकासाचे स्वप्नपूर्ती करण्याची जबाबदारी कारंजेकरावर आली असल्याचे, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक प्रसन्ना पळसकर यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना आपल्या मुलाखतीत सांगीतले आहे. तसेच "ज्याचे श्रेय त्यांना दिले नाही तर माणसातील माणूसकी आणि निष्ठा संपल्यातच जमा असल्याचेही त्यांनी सांगीतले.