वाशिम/कारंजा : महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटनेचे मंगरूळपीरचे तालुका संघटक राजेश वानखडे यांना मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील वरली मटका सुरू करणाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने जिल्हयातील पत्रकारांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाची त्वरीत चौकशी होऊन कार्यवाहीच्या मागणीकरीता संबंधित महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना वाशिम यांच्या अनुषंगाने अवैध धंदेवाल्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाने, मंगरुळपिर येथे एकत्र येत, पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक मंगरूळपीर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.

यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, कारंजा तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे,तालुका कोषाध्यक्ष प्रा. सी.पी.शेकुवाले दैनिक लोकमतचे उपसंपादक दादाराव गायकवाड,दैनिक दिव्यमराठीचे मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी नाना देवळे,दैनिक लोकमत समाचार जी.एम. हुसेन NTV चे जिल्हा प्रतिनिधी फुलचंद भगत, दैनिक लोकपथ तालुका प्रतिनिधी प्रमोद भगत, इंडियन प्रेस कॉन्सिलचे जिल्हाध्यक्ष विनोद डेरे यांचेसह कालुभाई तवंगर, उषाताई नाईक राजेश वानखडे , विनोद गणवीर, अतिक खान, हफिज शेख, गालीब पटेल, दिगंबर आव्हडे , दामोदर जोंधळेकर, आशिष धोंगडे ,पवन कुमार कदम , महादेव काठोळे, ज्ञानेश्वर वरघट, दिगंबर सोनवणे आदींची उपस्थिती होती.
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल होणार ?
वृत्तसंकलनासाठी गेलेल्या मंगरुळपीर येथील महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे सदस्य यांना शिवीगाळ करून धमकवल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिल्या गुन्ह्याची नोंद घेणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंगरूळपीर यांनी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
दरम्यान सदर पत्रकार यांच्या सोबत झालेल्या घटनेचा जिल्हाभरात सर्वच पत्रकार संघटनेने निषेध करीत उपरोक्त आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....