चंद्रपूर :- वडीलाने दुचाकी वाहन Bike दिले नाही म्हणून 17 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना Shocking incident चंद्रपूर शहरातील माता नगर येथील भिवापूर वार्डात घडली.
प्रियांशु निर्दोष जयकर वय 17 वर्ष असे मृतक युवकाचे नाव आहे. असे आहे.
वडीलांजवळ प्रियांशु दुचाकीची सतत मागणी करत होता परंतु वडिलांनी नकार देत कशाला वाहन हवे, रिकामा फिरत जाऊ नको असे म्हणत त्याला दुचाकी दिली नाही.
काल दिनांक 9 जुलै रोजी प्रियांशु ने वडिलांना दुचाकी वाहनाची रट लावली परंतु वडिलांनी नकार दिल्याने प्रियांशु पायदळ बाहेर गेला, परंतु गाडी दिली नाही म्हणून त्याने हातावर ब्लेडने वार केले. त्यामुळे मुलाच्या जीवाच्या भितीने पित्याने दुस-या दिवशी आज दिनांक 10 जुलै ला दुचाकी दिली, मात्र त्याच्या मनात राग सलत असल्याने तो राग त्याने मनावर घेत वडील कामावर गेले असता सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी कुणी नसताना गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.