महाविकास आघाडीचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघांचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार संजय उत्तमरावजी देशमुख यांनी भगवान महावीर जयंती निमित्त दि.21 एप्रिल रोजी शहरातील महावीर चौक स्थित दिगंबर जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी संजय भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकल जैन समाजाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी महावीर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र खंडारे,सचिव नितीन बुरसे सर, कोषाध्यक्ष निरंजन वैद्य,वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व महोत्सव समिती सदस्य ॲड संदेश जिंतुरकर,अविनाश खंडारे, प्रफुल्ल आग्रेकर,निखील जोहरापुरकर,रितेश डांगुर, गहाणकरी,प्रांजल दर्यापुरकर, पारस खंडारे,संकेत फुलाडी, पारस गहाणकरी,सिध्देश नांदगावकर,प्रसाद देशमुख आदी उपस्थित होते.असे वृत्त प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून ॲड संदेश जिंतुरकर यांनी कळवीले आहे.