कारंजा (लाड) : इस सन 2019 ते 2021 पर्यंत संपूर्ण जगामध्ये न भुतो न भविष्यती अशा कोव्हिड 19 कोरोना महामारीने अक्षरशः कहरच मांडला होता. महाराष्ट्रातही शासनाने संचारबंदी घोषीत करून कुटुंबच्या कुटूंब जणूकाही अक्षरशः स्वतःच्या घरातच नजरकैद होऊन बसले होते. गोरगरीब मध्यमवर्गीय मजूर कामगारांचा रोजगारच बंद पडल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली होती.सर्दी, खोकला,ताप,अंगदुखीने डोके वर काढले होते. लोकांकडे उपचारासाठी पैसा नव्हता. परंतु अशावेळी माणसातील देव असणारे साधारण क्लिनिक मधील काही वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर मात्र सेवाभावी वृत्तीने निःस्वार्थ मोफत रुग्नसेवा देत होते. त्यापैकीच महत्वाचे नाव म्हणजे गांधी चौक कारंजा येथील डॉ.शकील मिर्झा ; डॉ. शकील मिर्झा यांनी कोरोना काळामध्ये कोणत्याही रुग्नाचे मनोबल खचणार नाही याची काळजी घेऊन, रुग्नांचे समुपदेशन केले. आणि त्यांचेवर मोफत उपचार करून प्रसंगी नागरीकांना हवी त्या मदतीचा हाथ सुद्धा दिला. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट कारंजा यांनी नुकताच त्यांना वैद्यकीय सेवेबद्दल राज्यस्तरीय "महाराष्ट्र भूषण" पुरस्काराने सन्मानित केले. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, स्थानिक आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या अध्यक्षते मध्ये आणि मुर्तिजापूरचे आमदार हरिशजी पिंपळे,प्रमुख पाहुणे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे,स्वागताध्यक्ष गिरीधारीलाल सारडा, सहस्वागताध्यक्ष निलेशजी सोमानी, वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ पुनम पवार, संस्थापक सचिव एकनाथ पवार यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या शाही कार्यक्रमात स्थानिक मिर्झा क्लिनिकचे सेवाव्रती डॉ.शकील मिर्झा यांना राज्यस्तरीय "महाराष्ट्र भूषण" पुरस्काराने गौरविण्यात आले. मानाचा फेटा, शाल,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देवून त्यांना महाराष्ट्र भूषण उपाधी देण्यात आली. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय त्यांनी दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांना दिले असून,त्यांना मिळालेल्या पुरस्काराने कारंजा येथील वैद्यकीय सेवाव्रती डॉक्टरांची मान सन्मानाने उंचावली असून त्यांना समाजसेवेसाठी बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.