माणुस.!
माणुस काय आहे?
हे महत्त्वाचं नाही
माणसात काय आहे
हे खूप महत्त्वाचं आहे !
माणुस म्हणून जन्मला
माणसासाठी जगत असतो
आपल्या सिमित आयुष्याला
नवा अर्थ लावत असतो !
मोह नको पैशाचा
गर्व नको रुपाचा
विचार नको गरीबीचा
आनंद हवा प्रेमाचा !
द्या जीवनाला अर्थ
नाहीतर सगळं व्यर्थ
एकदाच जन्म मरणं
रचलं ना तुझं सरणं !
माणसा म्हणतोस माझं
इथं काहीच नाही तुझं
नाशिवंत जीवन सारं
कर विचार आता बरं !
नको कपडे स्वच्छ
मन हवं स्वच्छ
लोक पाहती बहिरंग
ईश्वर जाणतो अंतरंग !
माणसाचे मोठेपण नसते
बंगला, गाडी, धन, पदावर
माणुस मोठा होत असतो
माणुसकी या गुणधर्मावर !
कवि:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....