मागील काही दिवसांपासून आरमोरी विधानसभा damaged crop क्षेत्रा अंतगत येत असलेल्या चारही तालुक्यात अवकाळी पाऊस,गारपिटीने थैमान घातला आहे.यामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नैसर्गिक आपत्तीमुळे येथील शेतकरी पुरते बरबाद होण्याच्या मार्गावर असल्याने शासकीय स्तरावरुन देय असलेली नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळणे क्रमप्राप्त ठरत आहे.यास्तव नुकसानग्रस्त पिकाचे तत्काळ पंचनामे करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी अंतगत येत असलेल्या चारही तालुक्यातील तहसीलदारांना दिले आहेत.
गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असुन जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नसल्याने येथील नागरिकांचे जीवनमान पुर्णता शेती व्यवसायावर अवलंबून आहे.मागील खरीप हंगामात आलेल्या नैसर्गिक आपत्तीतुन सावरण्यासाठी येथील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिक,मका तसेच भाजीपाला लागवड केली आहे.माञ काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उभ्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे तर मका पिकाला जबर फटका बसला असुन भाजीपाला पुरता जमीनदोस्त झाला आहे.
damaged crop शेतपिक ऐन भरात असताना आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन खर्च भरून निघणे तर दुर शेतकर्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे शेतकर्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकर्यांना एकटे न पडु देण्यासाठी शासकीय स्तरावरुन आवश्यक ती मदत तत्काळ देण्याचे निर्देश गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिले आहेत.त्या अनुषंगाने आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतगत येत असलेल्या आरमोरी, देसाईगंज,कुरखेडा व कोरची तालुक्यातील चारही तहसीलदारांना नुकसानग्रस्त पिकाचे तत्काळ पंचनामे करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश आमदार गजबे यांनी दिले आहेत.चारही तालुक्यातील तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मोका चौकशी करून पिक नुकसानीचा अहवाल यथाशिघ्र सादर करण्याचे निर्देश दिले असुन मोका चौकशी सुरु करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.