अकोला :-संत गाडगेबाबा आदर्श पुरस्कार प्राप्त आदर्श कोळंबी ग्रामपंचायत अंतर्गत दाळंबी गावाकरिता जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत
ग्रामस्थांचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावरील पाण्याच्या टाकी बांधकामाला मंजुरात मिळाली मात्र टाकी बांधकामाला योग्य जागा उपलब्ध नव्हती गावातील सर्व नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी कोळंबी ग्रामपंचायत सदस्य तथा समाजसेवक मधुकरराव गोपनारायण यांनी स्वतःच्या मालकी हक्काची
गावालगतच्या शेतातील जागा पाण्याच्या टाकी बांधकामासाठी ग्रामपंचायत नावे रजिस्टर खरेदी
करून दान दिली गावचा सर्वांगीण विकासासाठी तसेच ग्रामस्थांचे पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निस्वार्थ भावनेने एक पाऊल पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता जागा दान दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकासह परिसरामध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गावच्या विकासाकरिता सतत झटणाऱ्या कोळंबी ग्रामपंचायत सदस्य अभ्यासु व्यक्तीमत्त्व समाजसेवक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मधुकर गोपनारायण यांच्या कार्याची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी मॅडम
व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
जिप अकोलाचे विनय ठमके साहेब तेलंग मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन अकोला कालिदास तापी गटविकास अधिकारी अकोला पंचायत समिती व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अकोला प्रवीण पाचपोर मनुष्यबळ विकास सल्लागार राहुल गोडले सनियंत्रण तज्ञ अर्चना डोंगरे मॅडम माहिती शिक्षण संवाद तज्ञ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनामध्ये ग्रामपंचायत सदस्य मधुकर
राव गोपनारायण यांनाc आमंत्रित करून बि .वैष्णवी मॅडम मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अकोला अकोला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला करण्यात आला विशेष म्हणजे मधुकर गोपनारायण यांची सत्काराला
कोळंबी ग्रामपंचायत चे पदाधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते मात्र कोणीही फिरकले नाही निस्वार्थ भावनेने
समाजाकरिता केलेले दान मग ते ज्ञानाची असो की सकारात्मक
विचारांची असो युवा पिढीने आत्मसात केल्यास निश्चितच गावचा विकास झाल्याशिवाय
राहणार नाही समाजसेवक तथा ग्रामपंचायत सदस्य कोळंबी
आपल्या प्रतिक्रिया द्या....