वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घटना घडल्याचे वृत्त आहे. वाहतूक पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार दारव्हा रस्त्यावरील भरधाव वेगात जाणा-या दुचाकी (बुलेट)ने रस्ता ओलांडत असलेल्या पादचार्याला जोरदार धडक दिली. आहे. जबरदस्त अपघातात एकाचा मृत्यू झालाआहे. अद्याप ओळख पटलेली नाही. (दुचाकी)बुलेट मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बिट कॉन्स्टेबल उतरिय कार्यवाही करीत असल्याचे समजते आहे.