कारंजा - दिनांक 7 जानेवारी 2024रोजी सकाळी 11.30 वाजता कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे शुभ हस्ते शहा ता.कारंजा येथे स्थानीक विकास निधीतून संताजी महाराज संस्थान परिसरात ग्राम पंचायत मालकीच्या जागेवर सामाजिक सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 15 लक्ष रूपये , आणि 2515 अंतर्गत दिगंबर काटोले यांचे घर ते भवानी मंदीरपर्यंत सिमेंट रस्ता करणे अंदाजित किंमत 10 लक्ष रूपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे आहेत.सौ .वैशाली विजय काळे पंचायत समिती सदस्या, सार्वजानिक बांधकाम विभाग अधिकारी जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच, उप सरपंच , ग्राम पंचायत सदस्य व गावकरी मंडळी यांनी केले आहे.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्विय सहाय्यक यांनी कळविले.