वरोरा शेतातून जाताना वीज वितरण कंपनीच्या उच्च दाब वाहिनीच्या प्रवाहित तारा पडल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.
जामगाव येथील प्रशांत ताजने यांच्या शेतातून कृषी पंपाच्या पुरवठ्याकरिता वीज वितरण कंपनीची उच्च दाब वाहिनी गेली आहे.. या वाहिनीच्या जिवंत विद्युत तारा उद्धव पिंपळशेंडे यांच्या मालकीच्या दोन म्हशीवर पडल्याने म्हशींचा जागीच मृत्यू झाला. यात पिंपळशेंडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना वीज वितरण कंपनीने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी जामगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अक्षय ताजने यांनी केली आहे. दरम्यान, वीज वितरणकंपनीच्या नियमानुसार आर्थिक नुकसानभरपाई दिली जाईल. याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी व वरोरा पोलिस ठाण्याला कळविण्यात - आल्याचे अभियंता विनोदकुमार भोयर यांनी सांगितले.