वाशिम - ऐतिहासिक वारसा लाभलेले विदर्भातील सुप्रसिध्द व ऐतिहासिक तिर्थक्षेत्र म्हणून नावलौकीक असलेल्या वत्सगुल्म वाशिम येथील श्री बालाजी संस्थानमध्ये शनिवार,दि.१८ मे २०२४ रोजी श्री व्यंकटेश पद्मावती देवीचा विवाह सोहळा भाविक भक्तांच्या भरगच्च उपस्थितीत मोठ्या उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.या सोहळ्याचे मुख्य यजमान पदाचा मान मिळालेले श्री बालाजी संस्थानचे वहिवाटदार विश्वस्त अॅड. भवानीपंत काळू व यजमान दत्तात्रय तिखीले हे या शुभप्रसंगी उपस्थित होते. या विवाह सोहळ्यासाठी बालाजी मंदिराला चोहोबाजुंनी फुलांनी सजविले होते.सोहळ्याला वाशीमकरांनी मोठी गर्दी केली . होती.असे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी विलोसचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.