आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची अविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून केशव ज्ञानदेव किरसान तर उपाध्यक्ष म्हणून विनोद नानाजी खुणे यांची निवड करण्यात आली. नागरी सहकारी बँकेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात खेमनाथ डोंगरवार व चांगदेव फाये यांच्या नेतृत्वात १३ संचालक बिनविरोध निवडून आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी सुशील वानखेडे, संस्थेचे व्यवस्थापक हेमंत शेंद्र, संचालक जगन्नाथ जांभुळकर, आसाराम देव्हारे, वाल्मीक वलके, संजय कवाडकर, दशरथ लाडे, मुरारी मानकर, रामदास उसेंडी, सखाराम चौरीकर, भास्कर पुसाम, सीताबाई बड्डे, जानकाबाई पंधरे, केंद्रप्रमुख माणिक दरवडे, रामचंद्र खुणे, सितकुरा गाडगोने, उद्धव कवाडकर, नारायण नाकाडे, हेमंत पाटील झोडे, बाजीराव लाडे आदी उपस्थित होते. यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.