रामराज्य संपून कलीयुग सुरु झाले आहे. यामधून तरुन जाण्यासाठी बोकूडबळी प्रथा व्यसनाधिनता कायमची सोडून द्या.गायीचे संरक्षण करा.गोपालन करून त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करा. आईवडील हेच आपले दैवत आहे. त्यामुळे दिवसाचा आरंभ त्यांच्या दर्शनाने करा.आईवडीलाची सेवा करून पुण्य मिळवा.म्हणजे तुम्हाला पुन्हा मानवजन्म मिळेल. - आधुनिक संत दिलीप बाबा,लाठी.
वाशिम : "जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥ तो ची साधु ओळखावा । देव तेथेची जाणावा ॥" या उक्तीनुसार समाजातील सर्व मनुष्यप्राणी दिनदलित आदिवासी,प्राणीमात्र, मुक्या जीवांच्या स्वातंत्र्य व विकासाकरीता आपले अख्खे आयुष्य खर्ची घालून निःस्वार्थ सेवाभाव जोपासणाऱ्या आदर्श समाजसेवक जीवदया निष्काम कर्मयोगी आधुनिक संत दिलीपबाबा यांचा 68 वा जन्मोत्सव शेलू (बाजार) जवळच्या ग्राम लाठी येथील श्री दिलीप बाबा गोरक्षण जीवदया व्यसनमुक्ती संस्था लाठी,शेलू (बाजार) ता.मंगरूळपिर जि. वाशिम येथे साजरा करण्यात आला.यावेळी संत दिलीप बाबा यांच्या वाढदिवस समारोहाचा प्रारंभ ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाने करण्यात आला. सामुहीक राष्ट्रगान घेण्यात आले. यानंतर गायत्री परिवार विचार क्रांती युवा प्रकोष्ठ अकोला यांचे द्वारा गायत्री पंच कुंडीय यज्ञाने वाढदिवस संस्कार करून कर्भयोगी संत दिलीप बाबा यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांच्या अध्यक्षते खाली प्रमुख पाहुणे उमाशंकर गावंडे, ग्यानचंदजी गर्ग, हभप महादेवराव भुईभार, शिक्षण महर्षी भाऊसाहेब काळे, अरुणाताई गावंडे, गजानन सुर्वे, वसंतराव सुर्वे, प्रेमसिंग महाराज, दिलीपभाई शाह, श्यामसुंदरजी मुंदडा, आशिष मुंदडा, मोहन गोयनका, व्यसनमुक्ती प्रचारक तथा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे, प्रदिप वानखडे, डॉ सुभाष रत्नपारखी, विजय पाटील कडू,कैलास हांडे यांनी आपल्या मनोगतातून महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतांना सांगीतले की, निष्काम कर्मयोगी दिलीप बाबा हे अहिंसेचे पुजारी असून त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा व व्यसनाधिनतेवर प्रहार केले.श्रीक्षेत्र पोहरादेवी, वाघामाय संस्थान रुई, धामणगाव देव, मेळघाट इत्यादी आदिवासी बहुल भागातील बोकूडबळी किंवा हेल्याच्या बळीची कुप्रथा त्यांनी कायमची बंद करून प्राणी मात्रांना मुक्त स्वातंत्र्य बहाल केले. गोपालन व गोरक्षणावर भर दिला. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल प्रत्यक्ष पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, संत रामदेव बाबा आदींनी घेतली होती. यावेळी संत दिलीप बाबांनी आपले मौन्य सोडले. उपस्थितांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, "रामराज्य संपलेले आहे. सध्या कलिचे राज्य कलियुग सुरु आहे. कलियुगामधून तरून जाण्याकरीता बोकूडबळी प्रथा आणि व्यसनाधिनता कायमची सोडून द्या. गायीचे संरक्षण करा. गोपालन करून त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करा.
तुमच्या घरातच तुमचे दैवत आईवडील आहेत. प्रत्येक दिवसाचा आरंभ आईवडिलांच्या दर्शनाने करा. आईवडिलाची सेवा करा. त्यांच्या सेवेने पुण्य मिळवा.म्हणजे पुढील जन्मी तुम्हाला परत मानवाचा जन्म मिळेल."कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन मुंबई निवासी इंजि. अनिल मेश्राम यांनी केले. कार्यक्रम व्यवस्था व मान्यवरांचे स्वागत संत दिलीपबाबा यांचे परम स्नेही तथा शिष्यमंडळी परमानंद मोटवानी, प्रल्हादराव गावंडे, अजय ठाकुर, घनश्याम चांडक, ओम गोयनका, डॉ राम नागे, रामकृष्ण नागे गुरुजी, अवचार काका, शिवम जाधव इत्यादीनी केले.महाप्रसादाची देखरेख व्यवस्था आश्रमाचे व्यवस्थापक हरिभाऊ सुर्वे यांनी पार पाडली. महाप्रसादाने कार्यक्रम सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....