४ जानेवारी हा दिवस ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांचा जन्मदिवस या दिवशी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन साजरा केला जातो . ४ जानेवारी १८०९ रोजी फ्रान्स येथील कुप्रे या गावी लुईस ब्रेल यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी बालक लुईस आपल्या वडिलांच्या कारखान्यात खेळत असताना डोळ्याला धार धार अवजार लागून त्यांची दृष्टी गेली.आपल्या दृष्टी दोषाचा विचार न करता शिक्षणात प्रगती करण्यासाठी लुईस ब्रेल यांनी धडपड केली .
१८२९ मध्ये लुई ब्रेल यांनी सहा थेंबाची लिपी जी आज ब्रेल लिपी च्या नावाने संपूर्ण विश्वात अंध बांधवांच्या शिक्षणाचे साधन बनली आहे त्याचा आविष्कार त्यांनी केला .
विदर्भात ब्रेल लिपींच्या पुस्तकांची अंध बांधवांसाठी सतत मागणी होत असल्याने प्रा.विशाल कोरडे यांनी पुढाकार घेऊन विदर्भातील पहिले ब्रेल ग्रंथालय श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे स्थापन केले. या कार्यात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला , नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र , NAB जिल्हा शाखा अकोला व शिवाजी महाविद्यालय अकोला या सर्वांनी आपले सहकार्य दिले आहे .
या ब्रेल ग्रंथालयाचे संचालक म्हणून प्रा.विशाल कोरडे कार्यरत आहे.सदर ग्रंथालयात अंध बांधवांसाठी 1000 पुस्तके व ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत.
ही ब्रेल पुस्तके अकोल्यात प्रकाशित होत नसल्याने प्रा.विशाल कोरडे मुंबई व डेहराडून या ठिकाणावरुन पुस्तकांना उपलब्ध करून अकोल्यातील अंध बांधवांपर्यंत पोहोचवीत आहेत.
अकोल्यात प्रथमच प्रा. विशाल कोरडे यांनी ब्रेल लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले असून संपूर्ण भारतात विविध ठिकाणी याविषयी ते मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत . अंध बांधवा बरोबरच सर्वसामान्यांनाही ही लिपी यावी म्हणून प्रत्येक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व विविध सामाजिक संस्थांच्या सदस्यांना ते या लिपीचे प्रशिक्षण देत आहेत.
या ब्रेल ग्रंथालयाची सेवा निशुल्क असून ज्या अंध विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा शिक्षणासाठी उपयोग करायचा आहे किंवा ज्यांना ब्रेल लिपी शिकायची आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
अंध बांधवांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचेही आयोजन दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे निरंतर केले जात आहे . सदर ब्रेल लिपीची पुस्तके अत्यंत महागडी असल्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था यांनी या कार्यात आर्थिक देणगी किंवा अनुदान देऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रा.विशाल कोरडे यांनी लुई ब्रेल जयंतीच्या पूर्वसंध्येला केले आहे . ब्रेल लिपीच्या प्रचार प्रसारासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे प्रा.अरविंद देव,प्रा.गजानन मानकर, इव्हेंट मॅनेजर अनामिका देशपांडे, विजय कोरडे, डॉ.संजय तिडके पूजा गुंटिवार, नीता वायकोळे, विशाल भोजने, अंकुश काळमेघ , श्रीकांत कोरडे , सचिन शिरसाट व श्वेता धावडे हे सदस्य निरंतर कार्य करीत आहेत.
आपल्या प्रतिक्रिया द्या....