वाशिम(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज २६ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक राजेश चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहायक अधीक्षक सुनील घोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, मंजुषा कराळे,शितल पावडे, गजानन उगले यांच्यासह अन्य विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही शाहू महाराजांच्या यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.