अकोला; शहरी विभागाबरोबरच ग्रामीण विभागातही मतदार जनजागृती व्हावी या उद्देशाने मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांनी अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन दिव्यांग नव मतदार ज्येष्ठ नागरिक व महिला यांना शंभर टक्के मतदान करण्याचे आव्हान केले . *श्री गणेश कला महाविद्यालय कुंभारी येथून कुंभारी परिसरात मतदार साक्षरता अभियानाची सुरुवात कोरडे व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या चमूद्वारे करण्यात आली*. डॉ.कोरडे प्रत्यक्ष नव मतदारांशी चर्चा व संवाद करून त्यांना मतदानासारख्या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करण्याचे आव्हान करीत आहेत. ग्रामीण विभागात *मतदारांच्या टक्केवारीत वृद्धी व्हावी यासाठी श्री गणेश कला महाविद्यालयात २३ एप्रिल २०२४ रोजी जनजागृती पर विविध उपक्रम डॉ.कोरडे तर्फे राबवल्या गेले* . सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.के व्ही.मेहरे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे संपूर्ण अकोला जिल्ह्यात मतदार साक्षरता अभियानातून होणाऱ्या राष्ट्रीय कार्याचे कौतुक करून आम्ही सुद्धा संस्थेच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवू असे आश्वासन दिले. *डॉ. कोरडे यांनी प्राध्यापक वृंद व नव मतदारांना मतदानाची प्रतिज्ञा दिली*. ग्रामीण विभागात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक अशा मतदारांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे व्यवस्था केली असल्याचे सांगितले.*चला उठा जागृत होऊन करूया मतदान या डॉ. कोरडे यांच्या गीताला उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी साथ दिली* . या जनजागृती कार्यक्रमात प्रा.नाना भडके, प्रा. डॉ. सुनील पारिसे , प्रा. डॉ. सुधाकर मनवर , प्रा. डॉ. सुशील वावरकर , प्रा. सतीश जमधाडे , प्रा. संतोष धंदरे , प्रा. डॉ. बी. यु. जामनिक , प्रा. डॉ. प्रसन्न बगडे , प्रा. डॉ. प्रभाकर मोहे , प्रा.जयंत राऊत , प्रा. मेघराज गाडगे , श्री.भीमराव तायडे , श्री.गजानन निंबाळकर , श्री.सिताराम पवार
यांनी सहभाग नोंदवला . मतदार साक्षरता अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोल्याच्या अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा, सिद्धार्थ ओवे, अंकुश काळमेघ, विजय कोरडे, व महाविद्यालयातील सदस्यांनी सहकार्य केले .