तालुक्या मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सट्टापट्टी जुगार व्यवसाय तेजीत सुरू आहे. या सट्ट्यांचे आकडे लावण्यात पुरुष महिलांसह विद्यार्थीही गुंतले आहेत. या अवैध धंद्यामुळे भावी पिढी बरबाद होत असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे ब्रम्हपुरी पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून ब्रम्हपुरी शहरात अवैध सट्टा व जुगार व्यवसाय जोरात सुरू आहे. ग्रामीण भागातही याचे जाळे जोरदार पसरले असून बेकायदेशीररित्या बाजारपेठेत, पानटपरी वर कार्यालय उघडून चिटोऱ्याच्या भरवशावर हा धंदा सुरू आहे. १० रूपयावर एक हजार रूपये मिळत असल्याने अनेक कर्मचारी, व्यापारी, सुशिक्षीत बेरोजगार, कामगार तसेच हातावर आणून पानावर खाणारे मजूर सट्ट्यावर नशीब आजमाविण्यासाठी सज्ज आहेत.
या धंद्यात आता स्पर्धा निर्माण झाली आहे. अधिक ग्राहक आपल्याकडे सट्टा लावण्यासाठी यावे म्हणून मुख्य बाजारपेठेत व पान टपरीवर कार्यालय उघडून शासनमान्य परवानाप्राप्त व्यवसाय असल्याच्या थाटात बिनधास्त सुरु आहेत. कधी प्रशासनाच्या सहकार्याने तर कधी मुजोरीने सट्टाधारी आपला सट्टा व्यवसाय वाढवित आहेत. या अवैध सट्ट्यामुळे कुणाचे घर भरले जातं आहे...? तर कुणाचे खाली होतं आहे..? हे सर्व खुलेआम प्रकार बघता कुठेतरी ब्रम्हपुरी तालुका सट्टा,जुगार धाऱ्यापासून वाचवावी असे सुवैचारीक नागरिकांचे प्रशासनाला आव्हान होतं आहे.