कारंजा : प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिना निमित्त संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा होत असतांनाच स्थानिक श्री कामाक्षा देवी संस्थानचे अध्यक्ष दिगंबरपंत महाजन यांच्या मार्गदर्शनात, दि 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता,विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या अध्यक्षतेखाली,आई कामाक्षा मित्र मंडळाचे सुरज गुल्हाने,श्री कामाक्षा देवी संस्थानचे रोहीत महाजन यांच्या उपस्थितीत,
सन 1992 च्या कारसेवेतील श्रीराम भक्त कारसेवक उमेश अनासाने यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन,हारार्पण व महाआरती करण्यात आली. आरती नंतर भाजपाचे शहर अध्यक्ष ललित चांडक यांचेकडून भाविकांना बुंदीच्या लाडवाचा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.त्यानंतर कारसेवक उमेश अनासाने यांचा शाल ,श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संजय कडोळे यांनी सांगितले, "प्रभू श्रीरामचंद्र हे विश्वातील आदर्श पुरुषोत्तम असून त्यांचे संस्थान अयोध्या जन्मभूमित होणे ही आमच्या पिढीकरीता गौरवाची व भाग्याची गोष्ट आहे.
यावेळी गोंधळी दिनेश कडोळे, प्रतिक हांडे , विजय खंडार, सुरेश पांडे व शेकडो महिला पुरुष भाविकांची आवर्जून उपस्थिती होती असे वृत्त रोहीत महाजन यांनी कळवीले आहे.