ब्रह्मपुरी/प्रतिनिधी:- डॉ. पंजाबराव देशमुख कन्या कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रींच्या लेकींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
76 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त सत्र-2022-23 मध्ये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली कु. महेक शकील शेख हिच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. "बेटी बचाव बेटी पढाव"या संकल्पनेनुसार केलेले हे कार्य अतिशय स्तुत्य आहे. या उपक्रमाचे संस्थेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे, संस्थेच्या उपाध्यक्ष तथा कॉन्व्हेंटच्या प्राचार्या सौ. मनिषाताई बगमारे,महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदाताई ठाकरे, प्रा.एच.के. बगमारे,प्रा.एस के.खोब्रागडे,गोवर्धन दोनाडकर, सौरभ खांदे, निशा मेश्राम, सय्याम मॅडम, ज्योती गुरूनूले,निहाटे मॅडम, गेडाम मॅडम,संजय नागोसे, जयघोष सहारे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.