ब्रह्मपुरी: पाथरगोटा येथून लग्न समारंभ आटोपून स्व गावी परत येत असताना ब्रह्मपुरी -आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील रनमोचन फाट्या लगत असलेल्या नादुरुस्त रस्त्याच्या बाजूला असलेल्या बॅरिकेटवर मद्यधुंद अवस्थेत युवकांची मोटार सायकल आदळल्याची घटना 15 एप्रिल रोजी साडे सात वाजताच्या दरम्यान घडली असून
गिरीधर मानिक नाकतोडे वय(२५)रा. दिंघोरी (नान्होरी) असे जखमी युवकाचे नाव आहे त्याला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे
अपघातानंतरही सदर जखमी युवकाची अद्यापही ओळख पटली नव्हती मात्र त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकल क्रमांक एम एच चौतीस ए क्यू 24 81वरून घटनेचा लोकेशन तपासण्यात आला सदर गाडी नान्होरी येथील बगमारे यांच्या नावाने असल्याने ती गाडी जखमी युवक घेऊन गेला सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे