वाशिम : आपल्या हवामानाच्या अचूक अंदाजाने संपूर्ण राज्याचे लक्ष्य वेधणाऱ्या,वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील ग्राम रुई गोस्ता चे लोकप्रिय हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे पाटील यांचे अंदाज केव्हाच चुकीचे ठरत नाहीत.हे त्यांच्या आजपर्यंतच्या अंदाजाचे वैशिष्ट्य असल्यामुळे शेतकरी बांधव,त्यांचे कडून हवामान अंदाज जाणून घेऊन आपल्या शेतातील पिकांचे व इतर कामकाजाचे नियोजन करीत असल्यामुळे नैसर्गिक आपत्ती पासून त्यांचा बचाव होत असतो.त्यामुळे त्यांचे पावसाबद्दलचे अंदाज जाणून घ्यायला ग्रामस्थ आतुर झालेले असतात. ह्या वस्तुस्थितीमुळेच महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी त्यांचेशी दूरध्वनीवरून, येत्या मान्सून बद्दल संवाद साधला असता,त्यांनी येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना सुखदसा धक्का देणारे उत्तमोत्तम असे पाऊसमान राहणार असल्याचे सांगितले.त्यासोबतच खरीप हंगामही (पिक पाणी)चांगला होणार असल्याचे स्पष्ट केले. बळीराजाला फार मोठा दिलासा देणारा त्यांचा अंदाज पहाता शेतकरी वर्गाने खरिपाच्या तय्यारीला लगून पेरणीपूर्व कामे सुरु करायला काहीच हरकत नाही.यंदा जून जुलै (पूर्वार्धात) महिन्यातच पेरण्या उरकतील. असे हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी कळवीले आहे. . . चालू आठवड्या मधील हवामान अंदाजाबाबत त्यांनी सांगितले की,पूर्व पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गोवा प्रदेशासह आपल्या वाशिम, अकोला,अमरावती,यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिनांक १२ मे २०२४ ते दि. १७ मे २०२४ पर्यंत स्थान बदलवीत,कमी अधिक प्रमाणात,काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार अवकाळी पाऊस होण्याची दाट शक्यता असून,कोठे चक्रीवादळ तर कोठे काही भागात विजा कोसळतील. शिवाय गारपिट सुद्धा होईल.पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर वर्धा,भंडारा, गडचिरोली,यवतमाळ जिल्हयात तर अक्षरशः काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर जाण्याची सुद्धा शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे ग्रामस्थ शेतकऱ्यानी आपल्या शेतामध्ये मान्सूनपूर्व कामे करीत असतांना आकाशात बदलणारे वातावरण पाहून दुपारपूर्वी शेतातून घरी यायला पाहिजे. विजा चमकत असतांना धनगर व मेंढपाळ बांधवानी आपल्या शेळ्या,मेढ्या व जनावरे शेतात व हिरव्या झाडाखाली उभी करू नये.स्वतः देखील झाडाखाली थांबू नये.शेतातील इलेक्ट्रिक खांबाला स्पर्श करू नये.विजा चमकत असतांना आपले मोबाईल ( स्विच ऑफ) बंद करावेत.पाऊस आल्यानंतर नदी नाल्यांना पूर आल्यास पुरातून आपली जनावरे, बैलगाड्या,आपली वाहने (मोटार सायकल,कार,बस) नेऊ नये. असे आवाहन गोपाल गावंडे पाटील यांनी केले आहे .