पत्रकार कल्याणासोबतच सामाजिक समस्या निर्मुलन, परिवर्तन आणि उपक्रमांतून सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत काम करणाऱ्या संघटनांसोबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे सदैव मोलाचे योगदान राहील.असे अभिवचन लोकस्वातंत्र्यचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी माहिती अधिकार ,पोलिस मित्र आणि पत्रकार संरक्षण सेना तथा २४ न्यूज चॅनेलच्या चंद्रपूर येथे आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात बोलतांना दिले. या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र अध्यक्ष तुळशीराम जांभूळकर,यांच्या नियोजनात आणि महिला राज्याध्यक्ष सौ.शिल्पा बनपूरकर व विदर्भ अध्यक्ष किशोर मुटे आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या वर्धापनदिन समारंभात महाराष्ट्र रत्न व विविध पुरस्कार वितरणाचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी आपल्या मनोगतातून पुढे बोलतांना संजय देशमुख यांनी माहिती अधिकार संघटनेने आयोजित केलेल्या नाविण्यपूर्ण व सर्वांगसुंदर कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतूक केले.संघटना कोणतीही असो, परंतू तिचे सामाजिक क्षेत्रातील योगदान महत्वाचे आणि उल्लेखनिय असते.म्हणून अशा संघटनांना लोकस्वातंत्र्यचा नेहमीच पाठींबा राहील. त्याप्रमाणेच माहिती अधिकार संघटनेचे कार्य असून या गौरवास्पद वाटचालीबाबत त्यांनी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अविनाश सुकूंडे,राष्ट्रीय अध्यक्ष कैलासदादा पठारे,महाराष्ट्र अध्यक्ष श्री तुळशीराम जांभूळकर,महिला राज्याध्यक्षा सौ.शिल्पा बनपूरकर,विदर्भ अध्यक्ष श्री किशोर मुटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमात ईतर अतिथींसोबतच प्रमुख अतिथी म्हणून लोकस्वातंत्र्यचे संस्थापक - राष्ट्रीय अध्यक्ष श्री.संजय एम.देशमुख व केंद्रीय सचिव राजेन्द्रजी देशमुख यांचेही सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. सर्वप्रथम दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात, नंतर सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम,महाराष्ट्रातून आलेल्या नामवंतांचा विविध पुरस्कारांनी गौरव, मार्गदर्शनपर मनोगते आणि स्नेहभोजन असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून केन्द्र शासनाच्या अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य,व माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक- आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सुकूंडे हे होते.राष्ट्रीय अध्यक्ष कैलास दादा पठारे,महाराष्ट्र अध्यक्ष तुळशीराम जांभूळकर,मराठी फिल्म अभिनेते विजयकुमार खंडारे,राष्ट्रीय महिला अध्यक्षा जयश्री सोवेडेकर,महिला राज्याध्यक्षा सौ.शिल्पा बनपूरकर,विदर्भ अध्यक्ष कीशोर मुटे,कार्यकारी संपादक राज जांभूळकर,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.बंडू रामटेके,आय ए एस अॕकॅडेमीच्या उषा गीते,डिजीटल सोशल मिडीया अध्यक्ष जितेन्द्र चोरडीया, आदींची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी महाराष्ट्रातून ठीकठीकाणहून आलेल्या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विविध पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला बहूसंख्य पत्रकार,संघटना पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्रलय मशाखेत्री,श्रृती पवन सरकार यांनी तर किशोर मुटे यांनी अनेकांचे गुणगौरव करीत आभारप्रदर्शन केले.