नागपूर. (प्रति) :-
नागपूर महानगर पालिका ही स्टार बस च्या माध्यमातून विध्यार्थ्यांना बस प्रवासाची सुविधा पुरवित होती. कोरोनाच्या महामारी नंतर ही सवलत २० ऑक्टोंबर २०२२ पर्यत सुरु होती. परंतु अचानक ती पुढे बंद करण्यात आली. ही सवलत सुरु न केल्यामुळे शालेय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. ही अडचन लक्ष्यात घेवून या विरोधात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने विद्यार्थ्यांची स्टार बस पास सवलत पुर्वरत सुरु करण्यासाठी आज शहर अध्यक्ष विनोद हजारे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मनपा आयुक्त यांना भेटून निवेदन दिले. यावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश स्टारबस विभागाला मनपा आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आले. आता लवकरच विद्यार्थांना स्टारबस ची पास सवलत मिळेल, अशी आशा हजारे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे शहर अध्यक्ष विनोद हजारे यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळात निलेश कोढे, शुभम वाघमारे, दिव्या अतकरे,शीतल पटले,यश कांबळे, श्रावण बिसेन, निखील धुर्वे, वैष्णवी भुसारी,शिवानी विश्वकर्मा, गीता विश्वकर्मा, अनिषा लोणारे, शुभांगी जाधव, सेजल शेंडे, शुभाषिनी शोभेकर, सायली बावणे, अर्पिता फुले, सायली रामटेके, पल्लवी बुरडे, कस्तुरी खोरगडे, प्रणाली धनुकर , निकिता सोलंकी, दामिनी फटिंग , धरती धोंगडे, तनुजा नागदेवे, डीम्पल महल्ले, सारंग सपकाळ, श्रुती कनोजिया, रुपेश राऊत इत्यादि विद्यार्थी सहभागी होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....