वन्यजीव अनुसूची १ मध्ये येत असलेले व अतिशय दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या खवले मांजराला पकडून अवैधरीत्या जंगलात बांधून ठेवणाऱ्या तीन आरोपींना वनविभागाने अटक केली. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी झाली तर एकाची सुटका करण्यात आली. निताई दास, हृदय बाला श्रीनिवासपूर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी खवले मांजराला वनातच बांधून ठेवले होते. मात्र, वनाधिकाऱ्यांनी स्वस्त न बसता गोपनीय माहिती काढून खवले मांजराला शोधून काढले.