कारंजा : कारंजा तालुक्यात दि २९ एप्रिलच्या रात्री रात्रभर अवकाळी पाऊस अतिरेक करीत, धो धो कोसळ्यानंतर परत रविवारी दुपारपासून पाऊसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. कारंजा पंचक्रोशितील भागात गिर्डा,वाकी, वाघोळा, इंझोरी, म्हसनी, शेलूबाजार, वनोजा, लोहीबाजार इत्यादी ठिकाणी गारपिट झाली व पाऊसाचे तांडव सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
तसेच जिल्हयात मालेगाव, मंगरूळनाथ, कारंजा ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान सुरु असून, मतदाराना पाऊसामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून, पाऊसामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची दाट शक्यता आहे. रविवारचा कारंजा तालुक्याचा बाजार असून, लघुव्यावसायिक व ग्राहकांचे हाल होत असल्याची माहिती मिळत आहे. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद कडून अध्यक्ष संजय कडोळे यांचे कडून देण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....