तालुक्यात बऱ्याच वाळू घाटाचा लिलाव झाला असून त्याचे काही मापदंड ही शासनाने ठरवून दिलेले आहेत.मात्र सर्व अटी शर्तीतून मुक्त होतं या लिलाव झालेल्या रेती घाटाचे मालक, वाळू तस्करी करणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करीत वाळू घाटातून राजरोसपणे "सुपर एन्ट्री" च्या नावावर वीना रॉयल्टी अवैध वाळू वाहतूक करीत असून त्यामुळे तालुक्यातील रस्त्याची मोठी दैनावस्था झाली असून वाळू तस्करीचा सर्व प्रकार सर्वांच्या डोळ्या समोर घडत असताना सुद्धा यावर कारवाई बाबत कोणतेही सत्तेधारी अथवा विरोधी राजकिय पुढारी आवाज उठवत नसल्याने या वाळू माफियांच्या टोळीला राजकीय पाठबळ मिळत असल्याचे तालुक्यात स्पष्ट दिसून येत आहे
विशेषतः भालेश्वर, सोनेगाव येथील वाळू घाटाचे लिलाव झालेले नसून या घाटातून दिवसा व रात्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक केल्या जात असून तालुक्यातील जास्तीत जास्त राजकिय वरदहस्त लाभलेल्या लोकांचे व त्यांच्या सबंधित लोकांचेच ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक करीत असून यथे मोठ्या प्रमाणात राजकिय पुढारी व कर्मचारी यांनी आर्थिक व्यवहार केले असल्याने हा प्रकार घडत आहे असे या भागात लोक चर्चा सुरू आहे.तर काही गावात ग्रामपंचायत मुखिया सुद्धा पाच ते सहा हजार एंट्री घेतं असल्याने साध्या सदस्यांनी सुध्दा याबाबत काही हरकत न घेता आपले वाहन वाळू तस्करीसाठी वापरात असल्याने "बहती गंगा मे हात धो लो" या उक्तीला पूर्ण रूप आल्याचे तालुक्यात दिसून येत आहे
अवैध वाळू वाहतूक प्रकारावर आळा बसावा अशी मुख्य:त्वे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची मागणी असून याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही तर पिंपळगाव येथील प्रकरणा प्रमाणे स्वतःगावकरीच वाहने अडवतील व पोलीस स्टेशन मध्ये जमा करतील.असे चित्र भविष्यात सर्वत्र उभे व्हायला वेळ लागणार नाही एवढे मात्र सद्यस्थिती वरून नक्की निदर्शनास येत आहे. तर त्यामुळे होणाऱ्या नाचक्कीस अधिकारी, कर्मचारी व लालची राजकिय पुढारी स्वतः जबाबदार असणार आहेत.