कारंजा-( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) वसुधैव कुटुम्बकम या भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित जी- 20 कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे करण्यात येणार आहे.त्या अनुशंगाने शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात राज्याच्या वेळापत्रका नुसार वाशिम जिल्ह्यात 1 ते 15 जून दरम्यान विविध शैक्षणिक उपक्रम राबविन्यात येत आहेत.त्यानुसार यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थितीत दिनांक 15 जून रोजी प्रवेशोत्सव, लोकप्रतिनिधिना आमंत्रण,या जी 20 उपक्रमाची सांगता प्रभात फेरि काढून करण्यात आली.
सदर कार्यक्रमा करीता ग्राम पंचायत यावर्डी येथील सरपंचा विद्याताई परमेश्वर आमले,उपसरपंचा सावित्रीताई मडके, प.स.सदस्य शुभमभाऊ बोनके, पोलिस पाटिल सुनिलजी ठाकरे,सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष चंदूभाऊ रीठे, ग्राम पंचायत सदस्य शामलताई पाटिल, तूफानभाऊ बोनके, निलेशभाऊ ठाकरे व प्रतिष्टित नागरिक म्हणून परमेश्वर आमले आदि लोकप्रतिनिधि उपस्थित होते.
प्रथमता शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधिच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच शाळेत आयोजित केलेल्या जी-20 उपक्रमा बाबत माहिती देऊन जी 20 उपक्रमाचे महत्व विषद केले.
यानंतर वर्ग 8 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे गुलाब पुष्प देऊन उपस्थित लोकप्रतिनिधिनी स्वागत केले. त्यानंतर लोकप्रतिनिधिच्या उपस्थितित प्रभात फेरी काढण्यात आली.त्यामध्ये मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व याबाबत विविध नारे देऊन विद्यार्थ्यानी सम्पूर्ण गावात जनजागृती केली.
कार्यक्रमाचे संचालन कु.शालिनी ओलिवकर तर आभार गोपाल काकड यांनी मानले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास काळबांडे, भालचंद्र कवाने,राजू लबडे, राजेन्द्र ऊमाळे,राजेश लिंगाटे या शिक्षकेत्तर कर्म. अथक प्रयत्न केले. असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी दिले असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....