बुलडाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुप बुलडाणा व सप्तसुर म्युझिकल ग्रुप अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या राष्ट्रीयकृत सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी "गाता रहे मेरा दिल" या हिंदी सुरेल गीतांच्या बहरदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता "हॉटेल शगुन" बाल शिवाजी शाळेजवळ, जठार पेठ , अकोला येथे आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी कार्यक्रमात "गाता रहे मेरा दिल" सिने अभिनेत्री व पार्श्वगायिका दिपाली देसाई तसेच अनंतभाऊ देशपांडे व्हॉईस ऑफ लता आणि संच यांचे सुमधूर आवाजात भारतरत्न मनोजकुमार यांना गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
सदर कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे . अधिक माहितीकरता दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा .