कारंजा (लाड) : स्थानिक विकासपुरुष माजी आमदार स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी आणि स्थानिक कारंजेकरांच्या विकासाच्या कार्याची पूर्तता करण्यासाठी, प्रेम,ममता आणि वात्सल्याचा जीवंत झरा असलेल्या,मायमाऊली सईताई प्रकाशदादा डहाके ह्यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची निवडणूक भाजप महायुती मित्र पक्षांकडून लढवीली आणि कारंजा मानोरा मतदारसंघातील सर्व जातीधर्मातील जनतेच्या मतदानरुपी आशिर्वादाच्या बळावर निर्विवाद जिंकून त्यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या स्थानिकच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा सन्मान मिळवून नवा विक्रम नोंदविला आहे.
स्व.प्रकाशदादा डहाके यांनी स्थानिक लढ्यासाठी आणि मतदारांच्या हितासाठी फार मोठा लढा उभारला होता.आणि मतदार संघातील जनतेच्या ह्या मुद्द्याच्या लढाईसाठी आपले जीवन खर्ची घातले होते.स्व.प्रकाशदादा डहाकेंचे संपूर्ण जीवनच संघर्ष करण्यात गेले मात्र याच स्थानिक लढ्यातून इ.सन 2009 मध्ये त जनतेच्या आशिर्वादाने ते पहिले स्थानिक आमदार देखील झाले होते.मध्यंतरी काही काळ ते सत्तेबाहेरही राहीले.मात्र पहिले स्थानिक आमदार होण्याचा त्यांचा इतिहास आहे.आज त्यांच्या माघारी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती मायमाऊली श्रीमती सईताई डहाके ह्यांनी करीत कारंजा मानोरा मतदार संघाच्या पहिल्या महिला आमदार व स्थानिक दुसऱ्या आमदार म्हणून निवडून येत खऱ्या अर्थाने स्व.प्रकाशदादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे . त्यांच्या विजयाने कारंजा मानोरा मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. विशेष म्हणजे मायमाऊली आ.डहाके ह्या आशिया खंडातील सर्वात पहिल्या प्रथम स्थापन झालेल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती सुध्दा आहेत. मतदारांना त्यांच्या रुपाने हक्काच्या पहिल्या स्थानिक आमदार मिळाल्याने सर्वत्र हर्षोल्हासात मतदारांकडून विजयोत्सव साजरा केल्या जात आहे. स्व.प्रकाशदादा डहाके यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले, श्रीराम व्यायाम शाळेचे अध्यक्ष तथा दैनिक मातृभूमिचे कारंजा शहर प्रतिनिधी अमोल अघम यांनी सर्व मित्र परिवाराच्या उपस्थितीत नवनिर्वाचित महिला आमदार श्रीमती सईताई डहाके यांचे हार्दिक अभिनंदन केले असून,आता कारंजेकरांनी विकासाबाबत निश्चींत रहावे. मायमाऊली श्रीमती सईताई डहाके यांच्या सक्षम नेतृत्वात कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात विकासाची गंगा वाहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली असल्याचा समाचार, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.