दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी)-: तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व इंडिया तायक्वांदो व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन वर्ल्ड तायक्वांदो, अशिया वर्ल्ड तायक्वांदो संलग्नित तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल सांगोला येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅडेट ज्युनिअर, क्यूरोगी व पूमसे तायक्वांडो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी मंद्रूपच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात यश संपादन केले आहेत .यश संपादन केलेल्या खेळाडूंचे खालील प्रमाणे नावे. (कॅडेट) प्रतिभा राठोड सुवर्ण, अथर्व उंबरजे सुवर्ण, साक्षी राठोड, (सुवर्ण) जूनियर गट:- तनुजा पवार (सुवर्ण) महेक शेख (रौप्य) असे एकूण चार सुवर्ण एक रौप्य पदक पटकावले आहेत तर सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचे नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यश संपादन केलेल्या खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमी मंद्रूप मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले तर यश संपादन केलेल्या खेळाडूंचे महाराष्ट्र तायक्वांडो अध्यक्ष अनिल आबा जोडगे, व तायक्वांदो महाराष्ट्राचे महासचिव सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र संदीप ओबांसे,सिवो गफार पठाण, व सोलापूर जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष आमदार शहाजी (बापू) पाटील, सचिव प्रमोद दौंडे, सहसचिव नेताजी पवार, खजिनदार गुरुलिंग गंगनहळ्ळी, यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.