काँग्रेस नेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणी प्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहे.ही वार्ता दूरदर्शनच्या बातमीपत्रातून कळताच,कारंजा येथील काँग्रसचे निष्ठावान तथा धडाडीचे जिल्हा कॉग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक अँड संदेश जिंतुरकर यांनी या निर्णयाचे, "सत्यमेव जयते ! सत्य परेशान जरुर हो सकता है, लेकीन सत्य हार नही सकता ।" या शब्दात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे .