वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : गेल्या विधान सभेच्या जवळ जवळ तिन निवडणूकांपासून जिल्ह्याला, स्वतःच्या मतदार संघातील, पालकमंत्री न मिळाल्याने,दि 1 जुलै 1998 रोजी नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्याचा विकास अध्यापही रखडलेलाच असून, जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळालेले बाहेरचे मंत्री,वाशिम जिल्हयाचे पालकत्व सांभाळण्याऐवजी,स्वतःच्याच जन्मभूमी कर्मभूमीकडे जास्त लक्ष देतात.व हे मंत्री स्वातंत्र्यदिन-प्रजासत्ताक दिनाला झेंडा फडकविण्यापुरतेच मर्यादीत राहतात.त्यामुळे मागासलेल्या जिल्हयाच्या यादीत समाविष्ट असलेल्या वाशिम ह्या पंचवीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या जिल्ह्याचा विकासच झालेला नाही.वास्तविक चार जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या,आशिया खंडातील बाजारपेठ,तिर्थक्षेत्राचे ठिकाण (जैन धर्मियाची प्राचिन मंदिरे,जैनाची काशी म्हणून ओळख असलेल्या आणि श्री दत्तावतार श्री नृसिह सरस्वती स्वामींचे जन्मस्थळ असल्यामुळे येथे देश विदेशातून भाविक भक्त, पर्यटक येथे दररोज येत असल्यामुळे) कारंजा विधानसभा मतदार संघाला जिल्ह्याचा दर्जा मिळणे आवश्यक असतांना तसे झाले नाही.कारंजा शहराला सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाकडून तिर्थक्षेत्राचा किंवा पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून हवी तशी विकासाची कामे,केवळ स्थानिक पालकमंत्री मिळत नसल्याने झालेली नाहीत. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात औद्योगीक वसाहती होऊन मोठे उद्योगधंदे उभे राहीले नाहीत. त्यामुळे येथील बेरोजगारांच्या हाताला काम नाही.कारंजा ते वाशिम किंवा मुर्तिजापूर ते यवतमाळ रेल्वेमार्ग सुरु झाला नाही.बाहेरगावचे पाहुणे पालकमंत्री जिल्ह्यावर लादल्या जात असल्याने त्यांचा जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद नाही.त्यांचे जिल्ह्यात,पालकमंत्री संपर्क कार्यालय नाही.किंवा त्यांचा एखादा स्विय सहाय्यक वा खाजगी सचिव,सामान्य नागरिकांचे सामान्य प्रश्न सोडविण्यास उपलब्ध होत नाही. गेल्या सन 2019 च्या विधानसभा निवडणूकापासून,आज रोजी पाच वर्ष होऊनही बाहेरगावच्या कोणत्याही पालकमंत्र्याने, पालकत्वाची जबाबदारी स्विकारून येथील जिल्हास्तरिय शासकिय निमशासकिय समित्यांचे जसे की,संजय गांधी स्वावलंबन निराधार समिती, दक्षता समिती,आरोग्य समिती,नियोजन समिती,वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन लाभार्थी निवड समिती वगैरेचे गठण केले नाही.त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची कामे रखडलेली आहेत.व हा सर्व निपटारा करण्याकरीता आता वाशिम जिल्ह्याचा मंत्री मंडळात कमितकमी राज्यमंत्री म्हणून तरी स्थानिक आमदाराला सन्मान देऊन,स्थानिकचा पालकमंत्री देणे अत्यावश्यक आहे.अशी रास्त मागणी,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी हे सक्षम नेतृत्व असून,त्यांना विधान परिषदेसह,विधानसभेतील कामकाजाचा तिन वेळेचा प्रदिर्घ अनुभव असून ते ज्येष्ठ आमदार असल्यामुळे,जिल्ह्यातील प्रश्नाची जाण आहे.शिवाय ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष असून,त्यांनी जिल्ह्यात भाजपाचे संघटन मजबूत केले आहे.व भाजपा पक्षाला लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था,नगर पालिका व त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणूकांना भाजपाला सामोरे जायचे आहे.त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत,राजेंद्र पाटणी यांच्या रुपाने जिल्ह्याला स्थानिकचा पालकमंत्री मिळाला.तर त्याचा भाजपा पक्षालाच लाभ होणार आहे.व जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लागणार आहेत.तरी भाजपाश्रेष्ठी,भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांचा मंत्रीमंडळात समावेश करून जिल्ह्याला न्याय मिळवून देण्याची स्थानिक नागरिकांची मागणी पूर्ण करावी.असी विनंती महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.