कारंजा : प्रादेशिक विद्या प्राधिकरण, रविनगर नागपूर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशीम,विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने 29 डिसेम्बर रोजी कारंजा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विश्वभारती विद्यालय, कारंजा येथे करण्यात आले होते.
29 डिसेबर रोजी दुपारी 4:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी 14 प्रयोगाची निवड जिल्हास्तरीय प्रदर्शनी करिता निवड करण्यात आली.
प्रदर्शनाच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विश्वभारती संथेच्या अध्यक्षा उर्मिलाताई ठाकूर तर प्रमुख अतिथि म्हणून संस्थेचे संचालक सुभाष सेठ बजाज,उदयसिंह ठाकुर, डॉ. विवेक घुडे, शालीग्राम भिवरकर, डॉ. जवाहरमलाणी , डॉ. आर. सी मुकवाने, मुख्याध्यापक परेश ठाकुर तर बक्षिस वितरक म्हनुन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने तसेच विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात 49, माध्यमिक गटात 26, शिक्षक गटात 07 अशा एकून 82 प्रतिकृतीची मांडणी करण्यात आली होती.
समारोपीय कार्यक्रमात डॉ. आर सी मुकवाने, श्रीकांत माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सदर प्रदर्शनात प्राथमिक विद्यार्थी गटात आर.जे.प्रायमरी स्कूल कारंजाच्या स्पर्श तायडे यांनी सादर केलेल्या यूजेस ऑफ पुल्ली या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक, विद्यारंभ स्कूलची कार्तिक राठोड याने सादर केलेल्या एन्टी टेरेरिस्ट कार या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक वेदांत पब्लिक स्कूल पोहा चा तन्मय ठाकरे याने सादर केलेल्या हैड्रोलिक ब्रिज, चौथा क्रमांक कंकूबाई कन्या शाळेच्या श्रुष्टि बलखंडे हिने सादर केलेल्या एन्टी सुसाइड फैन, तर पाचवा क्रमांक आशा इंटरनॅशनल स्कूल कामरगांवच्या श्रीहरी हिंगणकर यांनी तयार केलेल्या ऑटोनोमस मॉर्डन ऑरगॅनिक फार्मीग या प्रतिकृतिचा समावेश आहे.
माध्यमिक विद्यार्थी गटामध्ये एस एन सी विद्यालयाचा शार्दुल जोगदंड यांनी तयार केलेल्या फ्री इलेक्ट्रिसिटी जनरेटर या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक, ब्ल्यू चिप कॉन्व्हेंटचा यश राऊत,यश महाकाळ यांच्या हायब्रीड ऍग्रो रोबो या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक, तर तृतीय क्रमांक श्रीमती एम.आर नागवानी हायस्कूलच्या अयोध्या कदम हीच्या ॲडव्हान्स गार्बेज व्हेईकल, चौथा क्रमांक संमती ज्ञान मंदिर च्या अरुण खंडारे हीने तयार केलेल्या स्मार्ट हायवे तर पाचवा क्रमांक विश्वभारती विद्यालयाच्या आशिष हेमंत खराटे यांनी तयार केलेल्या वॉटर टँक क्लिनिंग मेकॅनिझम या प्रतिकृतीचा समावेश आहे.
शैक्षणिक साहित्य निर्मिती गटांमध्ये प्राथमिक शिक्षकांमधून प्रथम क्रमांक जि.प.शाळा जयपुरचे शिक्षक राहुल दादाराव गुळदे यांच्या खेळातून गणित विज्ञान या शै.साहित्याला प्राप्त झाला, माध्यमिक शिक्षकांमधून जिल्हा परिषद हायस्कूल कामरगांव चे शिक्षक गोपाल खाडे यांच्या रंजक झाले गणित विज्ञान या शैक्षणिक साहित्याला व एस एन सी विद्यालय कारंजाच्या गोपाल चौधरी यांच्या सायन्स मॅजिक या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.प्रयोगशाळा परिचर गटांमधून मुलजी जेठा उर्दू स्कूल कारंज्याचे प्रयोग शाळा परिचर सय्यद इज्जतुल्ला अताऊल्ला यांनी तयार केलेल्या प्रयोगातून शिकूया विज्ञान या साधनाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
वरील सर्व प्रतिकृतीची व साहित्याची निवड जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन करता झालेली आहे. वाशिम जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे.
सर्व विजेत्या बालशास्त्रज्ञांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....