कारंजा : घरगृहस्थी सांभाळीत असतांना,आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरीत होऊन, गुरुदेवाच्या विचाराचा आयुष्यभर आपल्या भजन प्रवचना मधून प्रचार प्रसार करणाऱ्या,प्रल्हादजी अनासाने यांच्या निष्ठावान शिष्यमंडळीनी, त्यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमात गुरुदेवाचे पूजन करून, प्रल्हादजी अनासाने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सुखमय भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यांचे सोबतच त्यांचे पुतणे तथा साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राचे सहसंपादक उमेश अनासाने यांचा सुद्धा वाढदिवस असल्याने त्यांचे सुद्धा अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाचे प्रदिप वानखडे, संजय कडोळे,बबनराव शेंदूरकर उपस्थित होते.तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे संतोषराव केळकर, विजय खंडार आदींनी त्यांना शुभेच्छा पाठवून आम्हाला सतत आपले मार्गदर्शन मिळत रहावे अशी भावना व्यक्त केली.