कारंजा : अनुलोम संस्थेच्या वतीने दिनांक 12 ऑगस्ट रोजी यावर्डी येथील श्री बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात संविधानाची 75 री उपक्रम घेण्यात आला.
यावेळी अनुलोम संस्थेचे प्रवीण दिहाडे यांनी संविधानातील प्रमुख घडामोडी व संविधानाविषयी जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख पद्धतीने पोलीस पाटील सुनील ठाकरे उपस्थित होते.
प्रवीण दिहाडे यांनी पुढं पी.पी.टी डॉक्युमेंटरी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सविस्तर आणि सोप्या भाषेत संविधान समजेल अशा पद्धतीचे माहितीपर चित्रपट दाखविण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून या विषयातील प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून घेण्यात आली. संविधानातील विविध मुद्दावर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत हे संविधान आणि प्राचीन संस्कृतीचा इतिहास , संविधानातील मूल्य, कर्तव्य, तत्व यावर प्रकाश टाकण्यात आला. आपल्या संविधानाची पंचाहत्तरी उपक्रमात विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. असे वृत्त मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.