लोकस्वातंत्र्य विचारमंथन सभासद व सध्या अकोला येथे वास्तव्यास असलेले सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी डॉ.अशोक शिरसाट यांची उधाण (१९९८ ) या काव्यसंग्रहातून निवड केलेली बाबा ही कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बी.ए. भाग-३ च्या मराठी(आवश्यक ) या पाठयपुस्तकात २०२४-२५ करीता सामाविष्ट करण्यांत आलेली आहे. त्याबद्दल मराठी अभ्यास मंडळ , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अध्यक्ष तथा मान्यवर सदस्यांचे डॉ.अशोक शिरसाट यांनी मनःस्वी आभार मानले आहेत.
डॉ.अशोक सिरसाट यांच्या साहिकृतीला मिळालेला न्याय आणि त्यांना प्राप्त बहूमानाबध्दल त्यांचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून व सन्मित्र तथा मार्गदर्शक जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.अशोक इंगळे , प्रा.डॉ.भास्कर पाटील , प्रा.डॉ. कैलास वानखडे व त्यांच्या स्नेही जणांनी आदिंनी डॉ.शिरसाट यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.