वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या,सर्वश्रेष्ठ अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे व इतरही सर्वच कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने गेल्या सन 2019 पासून प्रलंबीत (स्थगीत) ठेवलेले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री-सचिव-आयुक्त यांना वारंवार विनम्र निवेदने देऊन सदर्हु कार्यक्रम घेण्याविषयी ते आग्रह करीत आहेत.विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी स्वतः केन्द्रसरकारचे सामाजिक न्याय मंत्री ना. रामदासजी आठवले यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सदर कार्यक्रम घेण्याविषयी सुतोवाच केलेले होते.महत्वाचे म्हणजे आंबेडकरी विचारसरणीतील साहित्यीक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा गुणगौरव करण्याकरीता आणि त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून,भारतिय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येत असतो.परंतु गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम शासनाकडून प्रलंबीत ठेवण्यात आलेला आहे,तरी शासनाने हा पुरस्कार सोहळा,सार्वत्रिक निवडणूकांपूर्वी लवकरात लवकर घेण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.तरी मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीची दखल घेऊन हा कार्यक्रम लवकरात लवकर आयोजीत करून आंबेडकरी जनतेला त्यांचा सन्मान द्यावा. अशी मागणी त्यांचेकडे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी लावून धरली आहे.