कारंजा : कारंजाचे श्रद्धास्थान असलेले व महाराष्ट्रातील व देशातील तसेच राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील श्री गुरु मंदिर विकास आराखड्याला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थित मध्ये मान्यता दिली.
एकूण १७०. २५ कोटी रुपये किमतीच्या या विकास आराखड्यातून श्री गुरु मंदिर व परिसराचा विकास, वेदशाळा बांधकाम, भक्त निवास तसेच भाविकांच्या दृष्टीने इतर विकासकामांचा समावेश आहे. रुंद रस्ते, पार्किंग तसेच विकासकामांसाठी लागणाऱ्या वाढीव जागेचे संपादन आदी बाबींचा प्रस्तावात समावेश करून तात्काळ शासनाला पाठविण्याचे निर्देश मा.संजय भाऊ राठोड यांनी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यावेळी पालकमंत्री महोदय संजयभाऊ राठोड यांनी या तीर्थक्षेत्र आराखड्यास कोणताही निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली. जिल्हास्तरीय मान्यता देऊन श्री गुरु मंदिर विकास आराखडा पुढील कारवाईसाठी मंत्रालय ते पाठविले आहे. व पालकमंत्री महोदय यांनी गुरुमाऊली, लवकरात हे काम पूर्ण करेल अशी भावना व्यक्त केली.
या सर्व कार्याचे श्रेय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय ना. देवेंद्रजी फडणवीस व अवर सचिव अमोलजी पाटणकर यांच्या नावाची चर्चा संपूर्ण कारंजामध्ये चालू आहे.