ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटेक्निक ब्रम्हपुरी येथे डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणूम साजरी करण्यात आली.
संस्थचे संस्थापक देवेंद्रजी पिसे,प्राचार्य सुयोग बाळबुधे, विभागप्रमुख नरेंद्र समर्थ,उमेश कांबडी,असद शेख,रुपेश ढोरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्राचार्य सुयोग बाळबुधे यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले व त्यांची प्रेरणा घेऊन सर्वांनी आपल्या जीवनाची वाटचाल करावी असा संदेशी दिला.
त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात वाचन दिवस म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचलन गिरीष साखरे यांनी तर आभार राहुल उके यांनी केले.