मानोरा/कारंजा : सध्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रचाराला उधाण आले असतांनाच वंचित बहुजन आघाडीचे उमेद्वार सुनिल बाबासाहेब धाबेकर यांच्या प्रचारासाठी त्यांचे अख्खे कुटुंबच प्रचारात उतरले असून सुनिल धाबेकर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या अर्ध्यांगीनी सौ निताताई धाबेकर,मुलगा रोहन धाबेकर आणि मुलगी कु.राधाताई धाबेकर ह्या देखील निवडणूक प्रचारात उतरल्या आहेत. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात मराठा समाजाचे प्राबल्य असून विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने या मतदार संघासाठी मराठा समाजाचे सुनिल बाबासाहेब धाबेकर यांना उमेव्दारी दिली आहे.त्यामुळे मतदार संघातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांकडून आनंद व्यक्त होतो आहे.यापूर्वी इसन 1994 मध्ये सुनिल धाबेकर यांचे वडील योजनामहर्षी स्व. बाबासाहेब धाबेकर यांनी लोकआग्रहास्तव नारळाचे झाड या निशानीवर अपक्ष निवडणूक लढवीली होती व त्यात ते प्रचंड मताधिक्याने विजयी झाले होते. यंदाच्या निवडणूकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे. आज संपूर्ण ताकदिनीशी मराठा,बौद्ध, मुस्लिम,गवळी समाज एकजुटीने त्यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसून येत असून गावोगावी खेडोपाडी त्यांना वाढता पाठींबा मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सुकन्या कु.राधाताई धाबेकर ह्यांनी देखील आपल्या वडीलांच्या प्रचाराची जबाबदारी उचलली असून कु.राधाताई ह्या गावोगावी सर्वधर्मिय शेतकरी, महिलामंडळी,वयोवृद्ध, मतदारांच्या भेटीगाठी घेऊन, माझे वडील सुनिल धाबेकर यांच्या गॅस सिलेंडर या पाचव्या क्रमाकांच्या चिन्हावर मतदान करून त्यांना निवडून आणा. माझे वडील माझे आजोबा दिवंगत आमदार योजनामहर्षी स्व.बाबासाहेब धाबेकर यांच्याच पावलांवर पाऊल टाकून संपूर्ण मतदार संघाचा रखडलेला विकास करतील.येथे एमआयडीसी आणून सुशिक्षीत बेरोजगार मजूर कामगारांच्या हाताला काम मिळवून देत त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करतील असे त्या पटवून देत आहेत.त्यामुळे प्रत्येक गावागावात मतदारांकडून त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. असे वृत्त सुनिल पाटील धाबेकर मित्र मंडळाकडून मिळत आहे.