कारंजा : आज दि. ९ रोजी शिवसेना भाजप युती सरकारचा पंचामृत ध्येयावर आधारीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला यामध्ये सिंचनयोजना,शेतकरी समृध्दी योजना,महिला सबलीकरण योजना,आदिवासी,मागासवर्ग, ओबीसी सह सर्व समाज घटकांचा विकास,रोजगार निर्मिती,महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पी एम निधी सोबतच महाराष्ट्र सरकारकडून वर्षाला सहा हजार रु. म्हणजेच वर्षाला १२ हजार रुपये,निवारा व भोजन, १ रुपयात पीक विमा, गोसंवर्धन योजना व विशेष म्हणजे महिलांचे आरोग्य व सुरक्षा आणि शिक्षणासारख्या अनेक लोकाभिमुख योजनांचा समावेश केल्याबद्दल शिवसेना कारंजा तालुका व शहर पदाधिकारी व शिवसैनिकाकडून स्थानिक झांसी राणी चौक, बायपास येथे शिवसेनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .याप्रसंगी शिवसेना जिल्हा उपप्रमुख मनोज पाटील दहातोंडे,तालुका प्रमुख मंगेश पाटील मूंदे, शहर प्रमुख अरुणभाऊ बिकड व अजयभाऊ मते,नितीन भाऊ पूनेवार, गजानन राऊत,श्रीकृष्ण देशमुख, बंटी घुले, ओम नाईकवाल, नंदू तोरसे, सुनीलआप्पा अलामवर,शिवाजी दुर्गे व असंख्य शिवसैनिक हजर होते. असे वृत्त शहर अध्यक्ष अरुणभाऊ बिकड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिले आहे .