कारंजा : विकासमहर्षी, स्व.प्रकाशदादा डहाके यांना अभिप्रेत असणारे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे पाणी वाशीम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाला मिळण्याकरीता मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे यांनी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत कारंजा शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक प्रसन्नाभाऊ पळसकर यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. याविषयी अधिक बोलतांना प्रसन्नाभाऊ पळसकर म्हणाले की, विकासमहर्षी स्व. प्रकाशदादा डहाके हयात असतांना त्यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील शेतजमीनी सिंचनाखाली आणून हरितक्रांती करण्याचे महत्वांकाक्षी स्वप्न पाहीले होते. व त्याकरीता तत्कालिन पाटबंधारे मंत्री ना. जयंतरावजी पाटील यांचे कडून वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे लाभक्षेत्रात वाशीम जिल्ह्यातील कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील शेतजमीनीचा अंतर्भाव करून कारंजा तालुक्याच्या सिमेवरून गोदावरी खोर्याच्या वैनगंगा उप खोऱ्यातून तापी खोर्यात (बुलडाणा जिल्ह्यात ) जाणारे पाणी उपकालव्याद्वारे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाला मिळावे म्हणून प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. व तशी मंजूरी मिळताच सन 2020-21 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजाचे सभागृहात पत्रकार परिषदही घेतली होती. परंतु सदरहू शेतकर्यांच्या विकासाची महत्वाची विकास योजना अंमलात येण्यापूर्वीच दुदैवाने विकासमहर्षी स्व प्रकाशदादा यांचे निधन झाले . व त्यानंतर दि 20 जून 2022 रोजी दुदैवाने शिवसेनेच्या अंतर्गत बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील शेतकर्याच्या दुदैवाने आज कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील लाखो शेतकर्याचा खऱ्या अर्थाने विकास घडवून आणणारे, शेतकऱ्याचे कैवारी असलेले स्व प्रकाशदादा डहाके हे हयात नाहीत. परंतु त्यांचे स्वप्न हे पूर्ण झालेच पाहीजे आणि त्यांच्या महत्वांकाक्षी योजनेचे श्रेय त्यांनाच मिळणे हे गरजेचे आहे. सध्या नवोदित युती शासनाचे मुख्यमंत्री ना एकनाथजी खडसे हे या प्रकल्पाबद्दल सहमत असून त्यांनी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना एकनाथजी शिंदे तथा उपमुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्याच्या वाट्याचे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाचे पाणी उपकालव्याद्वारे, आमच्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाला दिले पाहीजे. व कारंजा मानोरा विधानसभा आमदार या नात्याने राजेंद्रजी पाटणी यांनी या शेतकऱ्याच्या हिताच्या महत्वाकांक्षी प्रस्तावाचा पाठपुरावा करून हा प्रस्ताव मंजूर करायला हवा आहे. व या प्रकल्पाचा शेतकर्यांना जर लाभ मिळाला तर तीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक प्रसन्नाभाऊ पळसकर यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे व्यक्त केले आहे.