कारंजा- प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, जि. प. वाशिम, विज्ञान अध्यापक मंडळ, कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने विश्वभारती विद्यालय कारंजा येथे दि. 29 डिसेंबर रोजी कारंजा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले.
प्रदर्शनीच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदिपबाप्पू देशमुख, अध्यक्ष म्हनुन विश्वभारती विद्यालयांच्या अध्यक्षा उर्मिलाताई ठाकुर तर प्रमुख अतिथी म्हणून कारंजा पंचायत समितीचे उपसभापती देवानंद देवळे, संस्थेचे सचिव शालिग्राम भिवरकर,उपाध्यक्ष डॉ. विवेक घुडे,कारंजा पं.स. चे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, डॉ. आर. सी. मुकवाने, मुख्याध्यापक परेश ठाकुर, विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनीय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनाचा उद्देश विभागीय विजय भड यांनी स्पष्ट केला. कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदिपबाप्पू देशमुख यांनी विज्ञान प्रतिकृती कक्षाची फित कापून विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन केले व उद्घाटनीय भाषणात संशोधक वृत्ती वृद्धींगत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.कारंजा पंचायत समितीचे उपसभापती देवानंद देवळे यांनी आपल्या मनोगतात बालशास्त्रज्ञाना शुभेच्छा दिल्यात.कारंजा पं. स. चे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनात विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात उर्मिलाताई ठाकुर यांनी आजच्या शिक्षण प्रणालीबाबत मार्गदर्शन करुन मानवी जीवनात विज्ञानाचे महत्व विषद केले.
सदर प्रदर्शनीमध्ये प्राथमिक गटात 49, माध्यमिक गटात 26, शिक्षक गटात 07 अशा एकूण 82 प्रतिकृतींचा समावेश या प्रदर्शनीत करण्यात आला होता. सदर प्रदर्शनीला कारंजा तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी भेटी दिल्या. उद्घटनीय कार्यक्रमाचेे सुत्रसंचालन प्रकाश मुंदे यांनी तर आभार सौरभ तोमर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन गुप्ता, सुधीर तिड़के, गजानन जाधव,कृष्णा भिवरकर,रूपचंद कथाने, सोनाली चिंचाळे,रेखा वानखड़े,सावन चंदेल,ज्ञानश्वर गरकल, दीपक झळके, निकिता भगत,आनंद पेंटे,गणेश भिवरकर, विशाल तायडे आदिनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....