घुग्घूस (चंद्रपूर) : नकोडा येथील मस्जिद जवळ कार क्रमांक MH 6 AN 7692 या वाहनात मृतदेह आढळून आला. गोविंदा रघुनाथ लोणारे (45 )वर्ष रा. नकोडा असे मृतकाचे नावं असून तो नकोडा ग्रामपंचायतमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. तो चार दिवसापासून लापता होता याची तक्रार घुग्घूस पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असता पोलीस शोध घेत होते.
मात्र आज सकाळ पासुन मस्जिद जवळील एका घराजवळ उभ्या असणाऱ्या कारमधून बाजूला राहनाऱ्या नागरिकांना दुर्गन्धी येत असल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली यावेळी एपीआय टोपलमोडे, रवींद्र वाभीटकर, रणजित भुरसे, नितीन मराठे यांनी घटनास्थळी पोहचून मृतकाचे प्रेत ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शव विच्छेदन करण्यासाठी पाठविले पुढील तपास API टोपलमोडे हे करीत आहे