वाशिम : उमरा शम.येथे त्यागमूर्ति माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यामध्ये सुखदुःखामध्ये त्यांना आजीवन साथ देणाऱ्या व आपल्या मुलाबाळाची तमा न बाळगता,समाजातील दिनदुबळ्या लेकरासाठी, आपल्या पोटच्या दोन लेकराची खंत न बाळगता संघर्षमय जीवण जगत राहील्या.एक दिवस वस्तीगृहा मधील मुलाची जेवणाची व्यवस्था नसतांना स्वत:च्या हाथामधिल सोन्याच्या बांगड्या मोडुन त्यांची जेवणाची त्यांनी व्यवस्था केली.डॉ. बाबासाहेबाच्या यशामध्ये, आयुष्यभर गृहिणी म्हणून जीवन जगणाऱ्या त्यागमूर्ती रमाबाई यांचा सिंहाचा वाटा होता. अशा त्यागमूर्ती मातेला, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण,कला, क्रीड़ा व आरोग्य बहुउद्देशीय संस्था उमरा शम. ता. जि. वाशिम यांच्या कार्यालया मध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष शाहीर संतोष खडसे,व सौ.रेखा संतोष खडसे यांनी प्रतीमेच पुजन करुण अभिवादन केले .या प्रसंगी संतोष श्रुंगारे,श्रीपत खडसे,आलुकाबाई खडसे,वर्षा खडसे,आसीत खडसे,सुजीत खडसे,प्रज्वल खडसे उपस्थित होते.