कारंजा : वाढदिवसानिमित्त, आपल्या कार्यकर्त्याशी हितगुज करतांना,विकासपुरुष आ.राजेंद्र पाटणी यांनी, "कारंजा नगरीच्या विकासाकरीता,कारंजा नगर पालिकेत भाजपाची सत्ता आणायचीच."असल्याचे सुतोवाच करीत,आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवीलेला आहे.पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले की, "कारंजा नगरीच्या विकासाकरीता, राज्यशासनाकडून मी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला असून,टप्प्या टप्प्याने आपल्याला कारंजा शहरातील जास्तित जास्त विकास कसा करता येईल ? याकडेच लक्ष्य द्यायचे आहे. कोणत्याही लोकोपयोगी विकास कार्याला निधी कमी पडणार नाही याची काळजी मी घेणार आहे. मात्र कारंजा नगरीचा सर्वांगीन विकास साधायचा असेल तर कारंजा नगर पालिकेत भाजपाची सक्रिय कार्यकर्ते असणे आवश्यक आहे.म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व येणाऱ्या नगर पालिका निवडणूकीत सर्वशक्तीनिशी भाजपाचा झेंडा फडकवावा."असे आ.राजेंद्र पाटणी यांनी कार्यकर्त्यांना आवाहनच केले. त्यांच्या या आवाहनामुळे भाजपा कार्यकत्यांमध्ये निश्चित उत्साह निर्माण होण्यास मदत होईल. असे म्हटले जाते.त्यांच्या या आवाहनामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांच्या कारंजा नगर पालिकेचे भावी नगराध्यक्ष ललित चांडकच हवेत या मागणीला बळ मिळणार असून,संपूर्ण कारंजेकर नागरिकांनाही नगराध्यक्ष पदाकरिता आता हजरजवाबी, कार्यतत्पर,विश्वासू व निःस्वार्थ पणे कारंजेकर जनतेच्या हिताची विकास कामे करणारा नविन चेहरा पाहीजे.व ही कामगीरी केवळ आणि केवळ ललित चांडक हेच पूर्ण करू शकतात. केन्द्रात भाजपा,राज्यात भाजपा आणि स्थानिक स्वराज्य संस्था कारंजा नगरीतही भाजपाची सत्ता असल्यास, आणि महत्वाचे म्हणजे नगराध्यक्षपदावर ललित चांडक विराजमान असले तर, लवकरच कारंजा नगरीचा पूर्णतः विकास होऊन,संपूर्ण कारंजा नगरीचा मुखवटाच बदलून जाऊ शकतो.मात्र त्याकरीता भाजपा नेते आणि कार्यकर्ते यांनी आता प्रत्येक वार्ड मोहल्ल्यातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांवर लक्ष्य केन्द्रित करून, त्या गरजवंताची छोटी मोठी कामे मार्गी लावून त्यांना विश्वासात घेणे जरूरी आहे. व आज आणि आत्ता पासूनच,नगर परिषदेची सत्ता कशी काबीज करता येईल याकडे लक्ष्य केन्द्रित करण्याची गरज असून,कारंजा शहराच्या विकासाकरीता नगराध्यक्ष पदावर,कोणत्याही परिस्थितीत ललित चांडक यांना आरूढ करणे जरूरी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.